Delhi CM Arvind Kejriwal in Supreme Court demand increase in bai for some medical tests marathi News  
देश

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला आत्ताच एक कॉपी मिळाली आहे. मला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ पाहिजे. अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांची प्रकृती त्यांना प्रचार करण्यापासून रोखत नाही, हे विशेष. त्यांनी मोठ्या जोशात पक्षाचा प्रचार केला आहे आणि आता अंतिम टप्प्यात जामीन याचिका दाखल केली आहे. परंतु त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना जामीन मिळाला नाही पाहिजे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.

संतोष कानडे

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे २ जूनपर्यंत जामिनावर बाहेर आहेत. त्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. परंतु पुढेही जामीन मिळावा, यासाठी केजरीवालांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात धक्का बसल्यानंतर केजरीवालांनी हा नवीन डाव टाकला आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांनी रेग्युलर आणि अंतरिम दोन्ही जामीन याचिका दाखल केल्या आहेत. गुरुवारी दुपारी दोन वाजता सुनावणी झाली तेव्हा ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला.

ईडीने भर कोर्टात प्रश्न उपस्थित केला की, जर त्यांची प्रकृती खराब आहे तर ते इतक्या जोरजोरात निवडणुकीचा प्रचार का करत आहेत? अबकारी धोरण घोटाळ्यात अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच नियमित जामिनाला अर्ज केला. सध्या ते अंतरिम जामिनावर १ जूनपर्यंत जेलच्या बाहेर आहेत.

ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला आत्ताच एक कॉपी मिळाली आहे. मला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ पाहिजे. अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांची प्रकृती त्यांना प्रचार करण्यापासून रोखत नाही, हे विशेष. त्यांनी मोठ्या जोशात पक्षाचा प्रचार केला आहे आणि आता अंतिम टप्प्यात जामीन याचिका दाखल केली आहे. परंतु त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना जामीन मिळाला नाही पाहिजे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT