देश

Arvind Kejriwal: जेलमधून केजरीवालांनी दोन आदेश दिले? ईडीने दिले स्पष्टीकरण,'त्यांना सही करण्याची परवानगी...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपुर्वी कथित दारु घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. अटकेत असताना केजरीवाल यांनी दोन आदेश दिले, अशा चर्चा समोर आल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

Arvind Kejriwal Orders From Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपुर्वी कथित दारु घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. अटकेत असताना केजरीवाल यांनी दोन आदेश दिले, अशा चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर या गोष्टीवरुन वाद वाढला होता. भारतीय जनता पक्षाकडून याबद्दल तक्रा करण्यात आली. त्यानंतर यावर ईडीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत आणि त्यांना सध्या सरकारी फाइल्सवर स्वाक्षरी करण्याची परवानगी नाही, अशी माहिती ईडीने दिली.

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, कोठडीत असताना, त्यांना दररोज संध्याकाळी पत्नी आणि वकिलांना भेटण्याची परवानगी आहे. मात्र त्यांना सरकारी फाईल पाहण्याची किंवा त्यावर स्वाक्षरी करण्याची परवानगी नाही. या बैठकीदरम्यान काही सह्या झाल्या का? याचा तपास ईडी करत आहे. तपासात कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास ते २८ मार्च रोजी न्यायालयासमोर ठेवण्यात येईल, असेही तपास यंत्रणेतील सूत्रांचे म्हणणे आहे.

दिल्ली सरकारने म्हटले आहे की कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या वतीने त्यांना दोन सूचना मिळाल्या आहेत. (Latest Marathi News )

जलमंत्री अतिशी यांनी 24 मार्च रोजी सांगितले होते की मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या ताब्यात असताना त्यांना दिल्लीतील काही भागात पाणी आणि गटार संबंधित समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी, आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी त्यांना ईडी कोठडीतून दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे आणि चाचण्यांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सूचना पाठवल्या आहेत.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे तक्रार केली असून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने आदेश कसे जारी केले जात आहेत, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा गैरवापर होत असून त्यांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने आदेश काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याची तक्रारही त्यांनी ईडीकडे पाठवली आहे. (Latest Marathi News )

मुख्यमंत्र्यांच्या सूचना कोणत्या माध्यमातून मिळत आहेत हे दिल्ली सरकार किंवा आम आदमी पक्षाने अद्याप सांगितलेले नाही. या दोन्ही आदेशांपूर्वी केजरीवाल यांच्या पत्नीने त्यांचा एक संदेश दिल्लीतील जनतेला वाचून दाखवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहिण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT