Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal : ‘नायब राज्यपालच त्यांना हटवू शकतात’

‘आप’चे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. केजरीवाल यांना हटविण्याचा निर्णय नायब राज्यपाल घेऊ शकतात, अशी टिपणी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘आप’चे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. केजरीवाल यांना हटविण्याचा निर्णय नायब राज्यपाल घेऊ शकतात, अशी टिपणी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांनी केली.

केजरीवाल यांना हटविण्याची कायदेशीर मागणी करता येऊ शकत नाही. त्यांनी मुख्यमंत्री पदावर राहायचे की नाही? याचा निर्णय केजरीवाल यांनी स्वत: घ्यायचा आहे. कायद्याच्या कसोटीवर पाहायचे झाले तर नायब राज्यपालच यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

दिल्लीस्थित कांत भाटी नावाच्या व्यक्तीने केजरीवाल यांना हटविण्याच्या विनंती करणारी याचिका दाखल केली होती. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याची विनंती करणारी पूर्वाश्रमीचे आप नेते संदीप कुमार यांची याचिका फेटाळून लावली होती. या याचिकेत तथ्य नसल्याचे सांगत त्यावेळी न्यायालयाने कुमार यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT