देश

दिल्लीत पुन्हा 'आप'लं सरकार; केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज (रविवार) दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. केजरीवाल आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 

दिल्लीतील रामलीला मैदान येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. केजरीवाल यांच्या या शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही जणांना स्थान देण्यात आले आहे. तसेच, काही शिक्षकही उपस्थित आहेत. केजरीवाल यांच्यासह इतर 6 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

आमदारांसोबत बैठक

केजरीवाल यांनी शनिवारी रात्री आम आदमीच्या नवनिर्वाचित आमदारांबरोबर दिल्लीच्या विकासकामांवर चर्चा केली. दिल्लीतील कामांबाबत प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. दिल्लीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने रोडमॅप तयार करण्यात येणार आहे. 

दहा वाजता घेणार होते शपथ 

अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा दहा वाजता नियोजित होता. मात्र, दुपारी बारानंतर त्यांचा शपथविधी पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

Pune News : सिमेंट मिक्सर चालकाचा निष्काळजीपणा नडला; पाषाण-बाणेर लिंक रोडवरील दुर्घटनेत २५ वर्षीय तरुणाचा अंत!

Maharashtra Health Campaign : राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा निर्णय; ३१ मार्चपर्यंत राबविणार ९ विशेष आरोग्य मोहिमा!

PMC Elections : "आमचं आयुष्य आता होईल सुकर!" नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंहगड रस्तावासियांच्या अपेक्षा उंचावल्या

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT