Kejriwal & Modi  Sakal
देश

स्वतंत्र्यानंतर चांगल्या सरकारी शाळा बनवल्या असत्या तर देश गरीब नसता- केजरीवाल

शाळा या महासागरातील थेंबासारख्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांना संबोधीत करताना म्हणाले की 'मेक इंडिया नंबर-1' मोहिमेशी लोकांना जोडण्यासाठी देशभरात दौरे करणार आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, ही मोहीम बुधवारी हरियाणातील त्यांच्या जन्मस्थळापासून सुरूवात करणार आहे.

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत प्रत्येक मुलाला मोफत "प्रथम श्रेणी" शिक्षण मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. पुढे म्हणाले स्वतंत्र मिळाल्यानंतर लगेच गावागावात चांगल्या सरकारी शाळा बनवल्या असत्या तर देश गरीब राहिला नसता. आपण 75 वर्षे वाया घालवली आहेत. त्याचवेळी बोलताना केजरीवालांनी नरेंद्र मोदी यांना अपील केली की देशात पुढच्या 5 वर्षात 10 लाख शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सगळ्या राज्यांना सोबत घेवून एक सरकारी योजना तयार करावी.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम-श्री योजने अंतर्गत देशभरात 14,500 शाळा विकसित करून श्रेणीसुधारीत करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल म्हणाले ही खुप चांगली बातमी आहे, परंतु 14,500 शाळा या महासागरातील थेंबासारख्या आहेत. मी पंतप्रधानांना विनंती करतो की देशातील सगळ्या 10.5 लाख सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यात यावे. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT