देश

Coronavirus: लाट रोखण्यासाठी दिल्ली सरसावली; लग्न आता केवळ ५० जणांत लावा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संसर्गाला आळा घालण्यासाठी लग्नसमारंभात ५० लोकांची उपस्थिती अनिवार्य करण्याच्या केजरीवाल सरकारच्या प्रस्तावाला नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आज मंजुरी दिली. मात्र गर्दी आकर्षित करणाऱ्या  बाजारपेठांमध्ये लॉकडाउन लावण्यावरून सरकारचे तळ्यात मळ्यात सुरू झाले आहे. मिनी लॉकडाउनला केजरीवालांनी पाठिंबा दिला असतानाच त्यांच्या मंत्र्यांचा अशा लॉकडाउनला विरोध आहे. छटपूजेला बंदी घालण्याचे दिल्ली सरकारने नक्की केले आहे. मात्र भाजपने त्याला जोरदार विरोध केला आहे. 

दिल्लीतील कोरोना फैलावाची परिस्थिती पुढच्या आठवड्यात आणखी बिघडू शकते, असा इशारा नीती आयोगाने पुन्हा दिला आहे. प्रती १० लाख लोकसंख्येमागे नव्या कोरोनाग्रस्तांची दैनंदिन संख्या ५ ते ८००० वर जाण्याचा इशारा आरोग्य यंत्रणेने दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उद्या (ता. १९) सर्वपक्षीय आढावा बैठक बोलावली आहे.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंटेनमेंट भागात घरोघरी चाचण्या
आरटी-पीसीआर चाचण्या तातडीने दुपटीने वाढविण्याचा व निमलष्करी दलाची वैद्यकीय कुमक दिल्लीत पाठविण्याचा निर्णय केंद्राने त्वरित अमलात आणला आहे. आसाम, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांत तैनात असलेले सीआरपीएफ, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा दल व सीआरएसएफचे ७५ डॉक्‍टर व २५० वैद्यकीय कर्मचारी दिल्लीत दाखल होत आहेत. कंटेनमेंट विभागात घरोघरी कोरोना चाचण्या करण्यासाठी केजरीवाल सरकार ७,००० से ८,००० पथके नेमणार आहे. अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या ३५२३ वरून ६००० करण्यात येणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउनबाबत भिन्न भूमिका
गर्दीच्या बाजारपेठांमध्ये पुन्हा लॉकडाउन लावण्याचा अधिकार केंद्राने दिल्ली सरकारला द्यावा अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे तर आरोग्यमंत्री जैन यांनी, पुन्हा लॉकडाउनची गरज नाही, असे सांगितले. सिसोदिया यांनी लॉकडाउनऐवजी वैद्यकीय व्यवस्थापन सुधारले पाहिजे, असे मत व्यक्त केले.  

चांदणी चौक व्यापारी संघटनेचा पाठिंबा
प्रस्तावित निर्णयावरून व्यापारी संघटनांनीही जोरदार विरोध सुरू केला आहे. सरोजिनी नगर, कॅनॉट प्लेस, करोल बाग आदी बाजारपेठांतील व्यापारी संघटनांनी, कोरोना वाढीमुळे व्यापाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, असे म्हटले आहे. व्यापारी काळजी घेत आहेत. मात्र नागरिक ऐकत नसतील तर त्यात व्यापाऱ्यांचा काय दोष ? असाही सवाल या संघटनांनी विचारला आहे. चांदणी चौक व्यापारी संघटनेने मात्र पुन्हा लॉकडाऊनच्या निर्णयाला पाठिंबा दिला. 

कोरोना रोखण्यासाठी गृह मंत्रालय सरसावले 
दिल्लीतील वाढते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पुन्हा सुत्रे हाती घेतली असून खासगी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांमधील खाटांच्या उपलब्धतेसाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके १०० खासगी रुग्णालयांमध्ये पाहणी करतील. यासोबतच डीआरडीओ (संरक्षण संशोधन विकास संस्था) आपल्या विशेष कोरोना रुग्णालयामध्ये २५० आयसीयु खाटांमध्ये आणखी २५०  खाटांचा समावेश करणार आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत रुग्णांवरील उपराचाराची गरज भागविण्यासाठी दिल्ली विमानतळानजीकच्या डीआरडीओच्या रुग्णालयात अतिरिक्त २५० आयसीयु खाटांबरोबरच ३५ बायपेप खाटा देखील बसविण्यात येणार आहेत. या रुग्णालयासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३५ बायपेप यंत्रे दिली असून दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालय देखील २५ बायपेप यंत्रे देणार आहे. 

येथे लॉकडाउन शक्य
  हॉटस्पॉट भागातील बाजारपेठा 
  डीटीसी बस व मेट्रो (सार्वजनिक वाहतूक) 
  उत्तर प्रदेश,  हरियानाच्या सीमा 
  ओपीडीला गर्दी करणारी  मोठी रुग्णालये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT