Swati Maliwal Esakal
देश

Swati Maliwal : ‘मारहाण होताना केजरीवाल घरातच’

आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केजरीवाल यांचे सचिव विभवकुमार यांच्याकडून लाथाबुक्यांनी मारहाण होत असताना केजरीवाल हे घरामध्येच होते पण माझा आवाज ऐकून देखील ते बाहेर आले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मी या प्रकरणी कोणालाही क्लीनचीट दिलेली नाही असेही त्यांनी नमूद केले. मालिवाल यांच्या आरोपानंतर विभवकुमार यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी ही पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली होती. केजरीवाल यांच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाली होती का? अशी विचारणा केली असता मालिवाल म्हणाल्या की ‘सध्या दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरू असून मी देखील त्यांना सहकार्य करते आहे.

या प्रकरणात मी कुणालाही क्लीनचिट दिलेली नाही. मी दिवाणखान्यामध्ये वाट पाहात बसलेली असताना केजरीवाल हे देखील घरामध्ये होते. विभवकुमार यांच्याकडून मला जबर मारहाण करण्यात आली. मी किंचाळत असताना देखील कुणीही मदतीसाठी धावून आले नाही.

आजमितीस मी नेमकी कुणाविरोधात तक्रार करते आहे याची मला पूर्ण जाणीव असून माझ्या हक्कासाठी मी हा मुद्दा मांडते आहे.’ तत्पूर्वी केजरीवाल यांनी या घटनेलाही दूसरा पैलू असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT