Arvind Kejriwal 
देश

Arvind Kejriwal: तिहारमध्ये केजरीवालांचं वजन 5 किलोंनी घटलं! डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

२१ मार्च रोजी अटकेनंतर केजरीवाल यांचं वजन वेगानं कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. २१ मार्च रोजी त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं कालच हायकोर्टानं त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन घटलं आहे. (Arvind Kejriwal weight is decreasing rapidly in Tihar Jail claimed by AAP sources)

तिहार तुरुंग प्रशासनाच्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांची प्रकृती एकदम ठीक आहे. तुरुंगातील डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबाबत कुठलीही चिंता नाही. पण आम आदमी पार्टीच्या सुत्रांनी हा दावा केला आहे की, केजरीवाल यांच्या वजनात घट झाली असून ते सुमारे साडेचार किलोनं घटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

तुरुंग प्रशासनाची केजरीवालांच्या प्रकृतीवर लक्ष

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डायबेटिसचा त्रास आहे. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीवर तिहार तुरुंग प्रशासनांच विशेष लक्ष आहे. जर केजरीवाल यांच्या शरिरात ग्लुकोमीटर, इसबगोल, ग्लुकोज आणि साखरेचं प्रमाण जर कमी झालं तर वैद्यकीत अधिकारी काळजी घेत आहेत.

तर निरिक्षकांच्या मते केजरीवालांच्या प्रकृतीवर तुरुंगातील वैद्यकीय चिकित्सक नजर ठेऊन आहेत. सातत्यानं ते केजरीवालांजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेत आहेत. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेची तपासणी केली जात आहे. (Latest Marathi News)

केजरीवालांची तुरुंगातील पहिली रात्र अस्वस्थेत गेली

केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांची पहिलीच रात्र बैचेनीत गेली. सोमवारी रात्री उशीरापर्यंत ते एका अंगावरुन दुसऱ्या अंगावर असा झोपायचा प्रयत्न करत होते. पण त्यानंतर मंगळवारी ते स्थिर वाटले. त्यानंतर त्यांनी योगासनं केली तसेच तुरुंगाच्या नियमांनुसार त्यांना बिगर साखरेचा चहा आणि ब्रेड नाश्त्यामध्ये देण्यात आला. त्यानंतर त्यांनी वर्तमान पत्र वाचली आणि काही काळ टीव्ही देखील पाहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT