Asaduddin Owaisi 
देश

भित्रेपणा लपविण्यासाठी शिवसेनेने फक्त अग्रलेखच लिहावेत: ओवेसी 

वृत्तसंस्था

मुंबई : 'शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून आहे. हा भित्रेपण लपविण्यासाठी मग शिवसेनेचे नेते फक्त वृत्तपत्रात अग्रलेख लिहित बसतात', अशा शब्दांत 'एमआयएम'चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (शनिवार) टीकास्त्र सोडले. 'अग्रलेख लिहिणे बंद करून शिवसेनेने मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी', असे आव्हानही ओवेसी यांनी दिले. 

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना नेते संजय राऊत आणि ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. 'ओवेसी यांनी स्वत:ला हैदराबादपुरतेच मर्यादित ठेवावे. राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे; हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही! ओवेसी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या नावाखाली मुस्लिम समुदायाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. भविष्यात त्यांना याचा फटका बसेल', असे विधान राऊत यांनी केले होते. 

त्यावर ओवेसी यांनीही प्रत्युत्तर दिले. 'शिवसेना मोदी यांना घाबरते. त्यामुळे केवळ अग्रलेखच लिहिले जातात. आता अग्रलेख लिहिणे सोडून त्यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. माझे पूर्वजही भारतीयच होते, हे मी सिद्ध करू शकतो', असे ओवेसी म्हणाले. 

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्यावर राऊत यांनी भाजपवर टीका केली. 'तोंडी तलाक आणि एससी-एसटी कायद्यातील तरतुदींबाबत केंद्र सरकार अध्यादेश लागू करू शकत असेल, तर राम मंदिराच्या प्रश्‍नावर हा मार्ग का अवलंबिला जात नाही? आज संसदेत सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. 2019 मध्ये काय स्थिती असेल, माहीत नाही. राम मंदिर हा जनभावनेचा विषय असल्यामुळे त्यावरील तोडगा न्यायालयात निघू शकत नाही. हा राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे आणि पंतप्रधान मोदी हा निर्णय घेऊ शकतात', असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : नागपूरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT