Asaduddin Owaisi  Asaduddin Owaisi
देश

ओवैसी म्हणाले, मुघलांचा वापर करण्याची कल्पना कुठून आली?

सकाळ डिजिटल टीम

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यावर प्रेत्येकजण आपापले मत व्यक्त करीत आहे. अशात युक्रेनचे राजनयिक इगोर पोलिखा यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याची तुलना राजपुतांवर मुघल हल्ल्याशी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा खरपसून समाचार घेत एमआयएमचे (MIM) अध्यक्ष आणि हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी सुनावले.

मंगळवारी युक्रेनमधील (ukraine) एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर युक्रेनचे राजनयिक (Diplomat) इगोर पोलिखा नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पोलिखा यांनी युक्रेनमधील रशियन हल्ल्याची तुलना मध्ययुगीन भारतातील राजपुतांवर मुघलांच्या कथित नरसंहाराशी केली. पोलिखा यांनी पत्रकारांच्या माध्यमातून पुन्हा एकदा युक्रेनची मदत करण्याची मागणी जगातील सर्वोच्च नेत्यांकडे केली. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना थांबवण्यास मदत करण्याची विनंती केली.

त्यांच्या या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विटद्वारे (tweet) उत्तर दिले. ओवैसी यांनी ट्विट केले आहे की, ‘श्री, भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे अपूर्ण ज्ञान तुमच्याकडे ठेवा. तुमच्या वक्तव्यातून इस्लामोफोबियाचा वास येतो. जे काही चालले आहे ते चुकीच्या पद्धतीने सादर करू नका. मला आश्चर्य वाटते की नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना मुघलांचा वापर करण्याची कल्पना कुठून आली?, असे ते ट्टिटमध्ये म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT