Asaduddin Owaisi News esakal
देश

Asaduddin Owaisi Video : ''त्यांना माझी सावलीही नकोय...'' देशभरातील विरोधकांच्या आघाडीवर ओवैसी बरसले

संतोष कानडे

नवी दिल्लीः देशभरातील विरोधकांची आघाडी म्हणजे मोठमोठ्या चौधरींचा क्लब आहे, अशा शब्दात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

समान नागरी कायद्याबद्दल बोलताना ओवैसी म्हणाले की, आम्ही यूसीसीला विरोध करणार आहोत. विरोधकांना जर खरंच भाजपला हरवायचं असेल तर फरक दिसला पाहिजे. विरोधकांची बैठक म्हणजे मोठमोठ्या चौधरींचा क्लब आहे, बाकी नाही नाही. तुम्ही भाजपला २०२४मध्ये हरवणार आहात तर फरक दाखवा. भाजपने अजेंडा सेट केला आहे त्यावरच चालणार असाल तर उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, हे विरोधक म्हणजे मोठमोठ्या चौधरींचा क्लब आहे. तिथे असदुद्दीन ओवैसींची सावलीही नको आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, भाजपचं सरकार येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधी गटाचं काय चाललंय, हे लक्षात येत नाही.

दरम्यान, पाटना येथे देशातील सगळ्या विरोधकांची बैठक संपन्न झाली होती. ही बैठक नितीश कुमार यांनी बोलावलेली. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह देशातील नेत्यांची उपस्थिती होती.

परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे मात्र बैठकीला हजर नव्हते. ओवैसी म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री हे राजकारणातले छोटे-मोठे व्यक्ती नाहीत. त्यांना विरोधकांच्या बैठकीला का बोलावण्यात आलेलं नव्हतं? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी विरोधकांच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT