asaduddin owaisi reaction on modi modi chants in front of him in surat gujrat politics  
देश

Asaduddin Owaisi : सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा; संतप्त ओवेसी म्हणाले; 'मुलं त्यांच्या…'

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या सूरतमधील सभेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी या घटनेबद्दल पहिली खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसी म्हणाले की, दुसऱ्या दिवशी बालदिन होता आणि मुले वडिलांना हाक मारत होते. आपण बिल्किस बानोसाठी आवाज उठवत असल्यानेच आपला विरोध केला जात असल्याचेही ओवेसी म्हणाले.

आजतक या टीव्ही चॅनलवरील एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांना सूरतमध्ये काळे झेंडे दाखवून मोदी-मोदी घोषणा दिल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, दुसरा दिवस बालदिन होता, त्यामुळे मुलं पापा-पापा अशा हाका मारायला लागेल, तर मी काय करू शकतो. आमची अवस्था बघा, मी किती लोकशाहीवादी आहे. मी म्हणालो की काही फरक पडत नाही, कोई पत्थर से ना मारे कोई मेरे दीवाने को. त्या सभेतही मी म्हणालो द्या घोषणा. पण भाजपच्या मेळाव्यात जाऊन कोणी तेच केले असते तर काय झाले असते. फोन येतो शो चालवा मोदीजींच्या सुरक्षेचा भंग झाला म्हणून, असे ओवेसी म्हणाले

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

झालेल्या विरोधाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले, मी बिल्किस बानोचा उल्लेख केल्यामुळे त्यांना वाईट वाटल्याचे नंतर कळले. मी केडियामध्ये मारल्या गेलेल्या मुलांचा उल्लेख केला. मी डिस्टर्ब एरिया ऍक्टचा उल्लेख केला. तिथे लोकांना पिण्याचे पाणी नाही, असे ओवेसी यांनी सांगितले. सुरतमधील एका जाहीर सभेत काही मुस्लिम तरुणांनी ओवेसींना विरोध केला होता. ओवेसी स्टेजवर येताच काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली . काही लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा देखील दिल्या होत्या.

रॅलीच्या ठिकाणी स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मोदींच्या समर्थनार्थ आणि ओवैसींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि मंचावर उभे असलेले ओवैसी हे सर्व पाहत राहिले. सूरतच्या रॅलीत मुस्लिम तरुणांनी ओवैसींना काळे झेंडे दाखवले आणि गो बॅकच्या घोषणा दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT