Asaram-bapu 
देश

प्रकृती बिघडल्याने आसाराम एम्समध्ये; उपचार सुरु

सकाळ डिजिटल टीम

रुग्णालयात दाखल केल्यानंतर आसाराम समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जोधपूर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी सध्या जोधपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु आसारामची प्रकृती बिघडली आहे. युरिन इन्फेक्शनमुळे पाच दिवसांपासून आसारामला ताप आला होता. त्यानंतर शनिवारी तुरुंगातून जोधपूरमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं. सध्या डॉक्टर त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहेत. पाच दिवसांपूर्वी जेल डिस्पेन्सरीमध्ये उपचार सुरु केले होते.

पाच दिवसांच्या उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं अखेर तुरुंग प्रशासनाने आसारामला एम्समध्ये दाखल केलं आहे. प्राथमिक तपासात युरिन इन्फेक्शन वाढल्याचं निदान झालं आहे. तसंच त्यामुळे ताप येत असून आय़सीयुमध्ये उपचार सुरु केले आहेत. सध्या प्रकृती स्थिर असून इन्फेक्शन कमी झाल्यानंतर तापही कमी होईल असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर आसाराम समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही समर्थकांनी रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना यामुळे त्रास सहन करावा लागला.

गेल्या सहा महिन्यात आसारामची प्रकृती अनेकदा बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा प्रत्येकवेळी समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. अशा स्थितीमुळे जेव्हा जेव्हा रुग्णालयात आसारामला दाखल केलं जाते तेव्हा पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT