Owaisi_Ajit Pawar 
देश

नवाब मलिकांवरुन ओवैसींचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले...

अखिलेश यादव आणि आझम खान यांच्यावरुनही ओवैसींनी 'सपा'ला सवाल केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार सुरु असून विविध राजकीय पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढायला सुरुवात केली आहे. त्यातच राज्यातील राजकीय घडामोडींवर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांच्यावरुन ओवैसींनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Asduddin Owaisi targets Ajit Pawar over Nawab Malik has been in jail)

उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत बोलताना ओवैसी म्हणाले, एका घोटाळ्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे आझम खान खान तुरुंगात आहेत पण तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव का बाहेर आहेत? सापावाल्यांनो तुम्हाला माझं बोलणं कडवट वाटेल. आता अजून एक गोष्ट ऐका, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक तुरुंगात आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचेच उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र सिंचन घोटाळ्याचा आरोप असतानाही बाहेर का आहेत? हे काय सुरु आहे?

"तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत का? कोणी खरोखरच तुमचा नेता असेल तर तो तुमच्यासाठी लढेल, कोणी आकाशातून किंवा जमिनीतून बाहेर येणार नाही," अशा शब्दांत ओवैसींनी मुस्लीम मतदारांना चुचकारण्याचाही यावेळी प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

SCROLL FOR NEXT