Gautam Gambhir  
देश

Gautam Gambhir : स्वतःला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते; भाजप खासदार गौतम गंभीर यांचे विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार गौतम गंभीर यांनी मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र केल्याची घटना "अत्यंत लाजिरवाणी" असल्याचे म्हटले.

गौतम गंभीर यांनी शुक्रवारी म्हटलं की, स्वतःला भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटते. एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, मणिपूरसारख्या घटना सामान्य घटना नाहीत. त्या होऊ न देणे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे.

गंभीर म्हणाला, “हे खूप लज्जास्पद आहे. मला स्वतःला भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटते, कारण हे प्रकरण फक्त मणिपूरपुरते मर्यादित नाही. यामुळे संपूर्ण देशाची मान खालावली आहे. त्यामुळे याचे राजकारण करू नये.

4 मे रोजीचा हा व्हिडिओ बुधवारी समोर आल्यानंतर मणिपूरच्या डोंगराळ भागात तणावाचे वातावरण आहे. एका बाजूचे काही लोक एका समाजातील दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढतांना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या घटनेवर विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप गंभीर यांनी केला. ते म्हणाले की, ही सर्व 140 कोटी भारतीयांसाठी शरमेची बाब आहे. दोन महिला किंवा मुलींच्या बाबतीत असे काही घडत असेल तर ती संपूर्ण देशासाठी शरमेची बाब आहे. तसेच मणिपूरसारखी घटना भविष्यात कोणत्याही राज्यात घडू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT