Fire accident esakal
देश

Fire News : एकीकडे १५ मृतदेह पडले, तिकडं नवरीने मंडपात घेतले सात फेरे; कारण...

सकाळ डिजिटल टीम

धनबाद - धनबादमध्ये सुबोध श्रीवास्तव यांच्या मुलीचा विवाह मंगळवारी आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये पार पडला. पण शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वधूची आई, बहीण, आजोबा, मावशी यांच्यासह १५ जणांचा जीव गेला. पण आपल्या घरात एवढी मोठी दुर्घटना घडल्याची जाणीव वधू स्वातीला पूर्णपणे नव्हती. कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचं तिला सांगण्यात आलं नव्हतं. (Fire Death News in Marathi)

नववधूला फक्त घराला आग लागली असून तिची आई जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरील हास्य पूर्णपणे नाहीसं झालं होतं. मंगळवारी रात्री विवाहस्थळ सिद्धी विनायक येथे ना धुमधाम झाली ना, ढोलताशे वाजले. प्रत्येक्षात लग्नाचे विधी सुरू झाले. हे सर्व घडताना पाहून वधू स्वातीची नजर सतत आई, भाऊ आणि इतरांना शोधत होती. ते कोणीही दिसले नाही. अखेरीस तिने शांतपणे लग्नाचे विधी पार पाडले.

धनबाद येथील जोडाफाटक शक्ती मंदिर रोडवरील आशीर्वाद अपार्टमेंटला मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली होती. या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुबोध लाल यांच्या मुलीच्या लग्नासाठी हजारीबाग आणि बोकारो येथील नातेवाईक त्यांच्या घरी आले होते. मात्र या आगीत १५ जणांना आपला जीव गमवावा लागला.

धनबादचे उपायुक्त संदीप कुमार यांनी सांगितले की, आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या पूजेदरम्यान शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे लागलेली आग इतकी पसरली की १५ जणांना त्याचा फटका बसला. अपार्टमेंटला आग लागल्याने इमारतीत राहणाऱ्या सुमारे १०० लोकांनी गच्चीवर धाव घेतली. ते सर्व जण सुरक्षित आहेत. पण ज्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यांना आगीचा फटका बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT