Ashneer Grover
Ashneer Grover Sakal
देश

Ashneer Grover : 'भारतपे' 3 बिलियन डॉलरने बुडीत, रजनिश कुमारने कंपनीला डुबवले; अश्नीर ग्रोवर यांचा दावा

संतोष कानडे

Ashneer Grover News : आर्थिक गुन्हे शाखेने भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांच्यासह दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी कंपनीला बुडवले असून कंपनी ३ बिलियन डॉलरने बुडीत निघाल्याचं ग्रोवर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना कंपनीत घेणे ही माझी चूक होती, असं त्यांनी मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.

अश्नीर ग्रोवर पुढे म्हणाले की, मी भारत-पे सोडल्यापासून कंपनीची कुठल्याही मेट्रिक्समध्ये वाढ झालेली नाही. अनेकांनी कंपनीतून काढता पाय घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल समीर का निघून गेले? या प्रश्नाचं उत्तरही रजनिश यांनी दिलं पाहिजे.

ग्रोवर यांच्यावर गंभीर गुन्ह्यांच्या आठ कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी यांच्यावर फौजदारी खटले 409, 420, 467 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्नीर ग्रोवर पुढे म्हणाले की, मी अनेकदा आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी गेलेलो आहे. मी प्रामाणिक असल्यामुळे भीती वाटत नाही. गुन्हे शाखेत जातांना वकिलाशिवाय चौकशीला गेलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

81.28 कोटींची फसवणूक प्रकरण

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, दिल्लीस्थित फिनटेक युनिकॉर्नने अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या EOW मध्ये 81.28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. यामध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हेगारी, कट रचणे, फसवणूक करणे आणि पुरावे नष्ट करणे असे आरोप ठेवण्यात आले होते.

याव्यतिरिक्त, भारतपेने दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी खटला देखील दाखल केला होता, ज्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाकडून 88.67 कोटी रुपयांहून अधिक वसूल करण्याची मागणी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT