Ashok Gehlot Latest News Ashok Gehlot Latest News
देश

अशोक गेहलोत म्हणाले, भावना समजून घ्या; राहुल गांधींसाठी वातावरणनिर्मिती

पक्षातील एकतर्फी मत राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या समर्थनार्थ आहे

सकाळ डिजिटल टीम

Ashok Gehlot Latest News जयपूर : महिनाभरात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अद्यापपर्यंत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी याबाबत कोणतीही सक्रियता दाखवलेली नाही. एवढेच नव्हे तर अन्य कोणत्याही नेत्याने अध्यक्षपदासाठी दावाही व्यक्त केला नाही. अशा स्थितीत काँग्रेसच्या नूतन अध्यक्षाबाबत धाकधूक वाढली आहे. राहुल गांधींना पुन्हा पक्षाचे अध्यक्ष बनवण्यासाठी काँग्रेसमधील एका गटाने वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी देशभरातील काँग्रेसजनांच्या भावना समजून घेऊन अध्यक्षपद स्वीकारावे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले नाही तर काँग्रेसजन निराश होतील. पक्षाच्या नवीन अध्यक्षाबाबत सुरू असलेल्या अटकळींबाबत विचारले असता गेहलोत म्हणाले की, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अध्यक्ष व्हावे. राहुल गांधी अध्यक्ष झाले नाहीत तर देशात काँग्रेसची निराशा होईल. बरेच लोक घरी बसतील आणि आम्हाला त्रास होईल. राहुल गांधी देशातील सर्वसामान्य काँग्रेसजनांच्या भावना समजून हे पद स्वीकारावे, असेही गेहलोत म्हणाले.

पक्षात राहुल गांधींना नवे अध्यक्ष बनवण्याच्या बाजूने मत आहे. काँग्रेसने ७५ वर्षांत देशात लोकशाही जिवंत ठेवली आहे. त्यांच्यामुळेच आज मोदी देशाचे पंतप्रधान आहे. तसेच अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहे. लोकशाही नसती तर ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कसे झाले नसते. काँग्रेसने देशाला दिलेली ही देणगी आहे, असेही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) म्हणाले.

२०२४ ची लोकसभा निवडणूक मोदींसाठी सोपी नाही. ज्याप्रकारे ते स्वतः वेठीस धरले जात आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी ज्याप्रकारे त्यांना झटका दिला. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्याने मोदी सरकार हादरले होते. यामुळे २०२४ मध्ये काहीही होऊ शकते. महागाई आणि बेरोजगारी हे मोठे प्रश्न आहे. याबाबत पक्ष केंद्र सरकारवर दबाव ठेवणार आहे, असेही अशोक गेहलोत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT