Rashtrapati Bhavan sakal
देश

Rashtrapati Bhavan : ‘दरबार हॉल’ झाला ‘गणतंत्र मंडप’;‘अशोक हॉल’ला ‘अशोक मंडप’ नाव

राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’चे ‘गणतंत्र मंडप’ तर ‘अशोक हॉल’चे ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली. विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’चे ‘गणतंत्र मंडप’ तर ‘अशोक हॉल’चे ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली. विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये केले जाते.

भारतात प्राचीन काळापासून स्वातंत्र्याचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसून येते. त्यामुळे दरबार हॉलला ‘गणतंत्र मंडप’ हे नाव देणे समर्पक ठरते, असे राष्ट्रपती भवनाने निवेदनात म्हटले आहे. भाषेत एकरूपता आणणे आणि इंग्रजीकरणाची छाप मिटविण्यासाठी अशोक हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्यात आले आहे,’ असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.

‘‘सर्व कष्ट आणि दु:खापासून मुक्त असलेली व्यक्ती म्हणजे अशोक..’ हीच या शब्दाची व्याख्या आहे. याशिवाय सम्राट अशोकाच्या अनुषंगाने ‘अशोक’ शब्द सर्वपरिचित आहे. ‘अशोक’ हा एकता आणि शांततामय सहअस्तित्वाचे प्रतीक आहे.

देशाचे राष्ट्रीय चिन्हही सारनाथमधील ‘अशोक स्तंभा’वरूनच घेण्यात आले आहे,’’ असे निवेदनात म्हटले आहे. ‘अशोक’ हा शब्द अशोक वृक्षाच्या संदर्भातही वापरला जातो. या वृक्षाचे भारतीय धार्मिक परंपरा, कला आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व आहे,’ असे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. काँग्रेसने या नामांतरावर टीका केली आहे.‘दरबार’ची कोणतीही संकल्पना नसली तरीसुद्धा ‘शहेनशाह’ची वेगळी संकल्पना असल्याचा टोला काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी- वद्रा यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT