Ashoka Pillar Marathi News Ashoka Pillar Marathi News
देश

अशोकस्तंभाचा वाद : मूळ चिन्ह बनवणारे डिझायनर प्राणिसंग्रहालयात का गेले?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या छतावर बसवलेल्या अशोक स्तंभावरून (Ashok Stambh) वाद निर्माण झाला आहे. नवीन संसद भवनाच्या छतावर बसवलेल्या अशोकस्तंभात सिंह आक्रमक दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सारनाथमधील मूळ अशोकस्तंभावर सिंह शांत दिसत आहे. असे करून सरकारने अशोक स्तंभाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (Ashoka Pillar Marathi News)

अशोकस्तंभावरून (Ashok Stambh) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मूळ प्रतीकाची रचना करणाऱ्या दीनानाथ भार्गव यांच्या कुटुंबाने सांगितले की, ते सिंह पाहण्यासाठी तीन महिने प्राणिसंग्रहालयात गेले होते. दीनानाथ भार्गव हे भारतीय राज्यघटनेच्या हस्तलिखितावर मूळ राष्ट्रीय चिन्हाची रचना (designer) करणाऱ्या टीमचे सदस्य होते.

उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) सारनाथ येथे सापडलेल्या २५० बीसीच्या प्राचीन शिल्पाच्या आधारे त्याची रचना केली आहे. मूळ अशोकस्तंभ सारनाथ येथे १९०५ मध्ये उत्खननादरम्यान सापडला होता. ज्याची उंची सात फूट आहे. आता हा स्तंभ सारनाथच्या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या मूळ हस्तलिखिताची रचना करण्याचे काम रवींद्रनाथ टागोरांच्या कला भवन, शांतिनिकेतनचे प्राचार्य नंदलाल बोस आणि एका प्रसिद्ध चित्रकाराला दिले होते. बोस यांनी अशोकस्तंभाचे चित्र तयार करण्याचे काम दीनानाथ भार्गव यांना दिले होते, असे त्यांच्या पत्नी प्रभा यांनी सांगितले.

त्यावेळी दीनानाथ हे शांतिनिकेतनमध्ये कला शिकत होते. गुरूच्या सांगण्यावरून माझे पती तीन महिने कोलकाता येथील प्राणिसंग्रहालयात गेले. ते तिथल्या सिंहांचे हावभाव, सिंह कसे बसतात आणि कसे उभे राहतात हे पाहायचे, असे प्रभा यांनी सांगितले. भार्गव यांनी डिझाइन केलेल्या अशोकस्तंभाची (Ashok Stambh) मूळ कलाकृती त्यांच्याकडे अजूनही आहे, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

भार्गव यांनी अशोकस्तंभाची मूळ कलाकृती १९८५ मध्ये पूर्ण केली होती. दीनानाथ भार्गव यांनी डिझाइन केलेल्या कलाकृतीमध्ये तीन सिंह आहेत. त्यांचे तोंड थोडेसे उघडे आहे आणि दातही दिसत आहेत. खाली सुवर्ण अक्षरात ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले आहे.

थोडाफार फरक असणे स्वाभाविक

कोणत्याही मूर्ती किंवा चित्रात थोडाफार फरक असणे स्वाभाविक आहे. मध्य प्रदेशातील आर्ट गॅलरी किंवा संग्रहालयाला दीनानाथ भार्गव यांचे नाव द्यावे. तिथे त्यांनी संविधानासाठी तयार केलेल्या कलाकृतींचे जतन केले जावे, अशी मागणी दीनानाथ भार्गव यांच्या सुनेने केली आहे. अनेक नेत्यांनी आपल्याला हे आश्वासन दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत मागणी मान्य केलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई- मडगांव/हटिया आणि पुणे -दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त होळी विशेष चालवणार

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT