subramanian swamy Sakal
देश

घनी यांना भारतात आश्रय द्यावा; सुब्रह्मण्यम स्वामी

अफगाणिस्तानाचा ताबा तालिबानने घेण्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अफगाणिस्तानाचा (Afghanistan) ताबा तालिबानने (Taliban) घेण्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून पळून गेले आहेत. ते अन्य देशांकडे आश्रय मागत असताना भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. घनी यांना भारतात (India) आश्रय दिला पाहिजे, असे ट्विट (Tweet) स्वामी यांनी केले आहे. दरम्यान, अफगाण नागरिकांना भारतात यायचे असल्याचे त्यांना केवळ सहा महिन्यांचा व्हिसा दिला जाणार आहे.

घनी यांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आश्रय घेतला आहे. त्याचबरोबर तालिबानने भारतातून सर्व आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत भारत-तालिबान संबंधांच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यादरम्यानच सुब्रमण्यम स्वामी यांनी नवे विधान केले आहे.

स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘‘भारताने अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष डॉ. अश्रफ घनी यांना आश्रय द्यावा, त्यांना देशात वास्तव्यासाठी आमंत्रित करावे. ते उच्चशिक्षित आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT