Ashwini Vaishnaw sakal
देश

Ashwini Vaishnaw : लोकोपायलटच्या खच्चिकरणाचा प्रयत्न;केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांचा राहुल गांधींवर उलटवार

लोकोपायलट हे रेल्वे परिवारातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्याबाबत गैरसमज पसरवून त्याचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष व त्यांचे नेते राहुल गांधी करत आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नसून लोकोपायलट यांना निर्धारित तासामध्ये काम करावे लागत असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकोपायलट हे रेल्वे परिवारातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्याबाबत गैरसमज पसरवून त्याचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष व त्यांचे नेते राहुल गांधी करत आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नसून लोकोपायलट यांना निर्धारित तासामध्ये काम करावे लागत असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला.

काही दिवसांपूर्वीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील लोकोपायलटांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेत लोकोपायलटना अतिरिक्त तास काम करावे लागते, विश्रांती मिळत नाही, अशी तक्रार काहिंनी केली होती. यावर आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.

ते म्हणाले, ‘‘लोकोपायलटचे सरासरी कामाचे तास नियमानुसार म्हणजे आठ तासांपेक्षा कमी आहे. २०१४ पूर्वी लोकोपायलटच्या केबिनची स्थिती वाईट होती. २०१४ नंतर ही स्थिती सुधारण्यात आली. लोकोपायलटची ड्यूटी संपल्यानंतर ते विश्रांती कक्षात आराम करतात. हे विश्रांती कक्ष वातानुकूलित आहेत.’’ परंतु खरी माहिती जाणून न घेता काँग्रेसने टीका केल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे. लोकोपायलटचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु रेल्वे परिवारातील कर्मचारी देशाची सेवा करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT