Global warming climate change 
देश

सावधान, आशिया खंड उष्ण होतोय!

‘डब्लूएमओ’चा अहवाल : २०२१ मध्ये जागतिक सरासरीपेक्षा तापमान अधिक

सकाळ वृत्तसेवा

जीनिव्हा : जागतिक तापमानवाढ, हवामान बदलाचे मोठे आव्हान जगापुढे आहे. तापमानवाढीच्या जागतिक सरासरीपेक्षा २०२१ मध्ये आशिया खंडात अधिक तापमान वाढले. त्यातून आलेल्या पूर, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे आशियात ३५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. यात भारतातील सात अब्ज डॉलर नुकसानीचाही समावेश आहे, असे जागतिक हवामान संस्थेच्या (डब्लूएमओ)अहवालातून समोर आले आहे.

‘डब्लूएमओ’चा आशियातील हवामान स्थिती हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. या अहवालात म्हटले आहे, की आशियात २०२१ मध्ये नोंदविले गेलेले सरासरी तापमान ते १९८१ ते २०१० या ३० वर्षांच्या तुलनेत ०.८६ अंश सेल्सिअसने जास्त आहे. याच वर्षी नोंदविले गेलेले जागतिक सरासरी तापमान १९८१ ते २०१० च्या तुलनेत केवळ ०.४२ अंश सेल्सिअसने अधिक आहे. प्रादेशिक तापमानवाढीच्याबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नसल्याने डब्लूएमओ तापमान मोजण्यासाठी औद्योगिकरणाच्या पूर्वीचा संदर्भ वापरत नाही.

त्या तुलनेत अलीकडील ३० वर्षांच्या तुलनेत तापमानवाढ मोजली जाते. सागरी वातावरणातील एक घटना असलेल्या ला निनाचा प्रभाव दीर्घकाळ टिकल्यामुळे आशियात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये तापमानवाढ किंचित कमी राहिली. तरीही, नोंदी ठेवण्यास सुरुवात केल्यापासून २०२१ हे वर्ष आशियासाठी पाच ते सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले, असेही या अहवालात म्हटले आहे. मात्र, चीन, हाँगकाँग आणि बहारिनसाठी २०२१ हेच वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले.

तापमानवाढीमुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे वित्तहानीचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या २० वर्षांच्या सरासरी नुकसानीच्या तुलनेत २०२१ मध्ये दुष्काळामुळे ६३ टक्के अधिक नुकसान झाले. त्याचप्रमाणे, पुरामुळे २३ टक्के अधिक वित्तहानी झाली. आशियाई देशांचा आपत्ती निवारणाचा खर्चही वाढत आहे. दरवर्षी चीन सर्वाधिक अंदाजे १८८ अब्ज डॉलर खर्च करतो. त्यानंतर, भारत (४६.३ अब्ज डॉलर) व जपान २६.३ अब्ज डॉलर या देशांचा क्रमांक लागतो.

आशियात १०० नैसर्गिक आपत्ती

वाढत्या तापमानामुळे आशियामध्ये नैसर्गिक आपत्तींचे प्रमाणही वाढत आहे. २०२१ मध्ये आशियात १०० पेक्षा अधिक नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली. या आपत्तींमुळे चार हजारांपेक्षा अधिक जणांनी प्राण गमावले. तर एकूण ३५.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. यात भारतातील सात अब्ज डॉलरच्या नुकसानीचाही समावेश आहे. यात प्रामुख्याने पूर, दुष्काळ, अतिवृष्टी आदींचा समावेश आहे. आशियात पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले तर दुष्काळामुळे सर्वाधिक लोक प्रभावित झाले.

१९८१ ते २०१० च्या तुलनेत २०२१मधील

सरासरी तापमानवाढ (अंश सेल्सिअसमध्ये)

आशिया ०.८६

जग ०.४२

पुरामुळे झालेले नुकसान (अब्ज डॉलरमध्ये)

चीन १८.४

भारत ३.२

थायलंड ०.६

चक्रीवादळाचे नुकसान (अब्ज डॉलरमध्ये)

भारत ४.४

चीन ३

जपान २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT