Assam  sakal
देश

Assam : आसाममध्ये २२ लाख जणांना पुराचा फटका,प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवर; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीरच असून राज्यातील २२ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी : आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीरच असून राज्यातील २२ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी पूरग्रस्त दिब्रुगडची पाहणी केली. दिब्रुगडमध्ये आठ दिवसांपासून विद्युत प्रवाह खंडित आहे.

सरमा यांनी पायी चालत दिब्रुगडमधील काही भागांना भेट देत पूरग्रस्तांशी संवाद साधला. दिब्रुगडमधील पुराच्या समस्येवर समुदाय आधारित तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ व स्थानिक रहिवाशांची मदत घेतली जात जाईल,’’ असेही सरमा यांनी सांगितले. ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने तसेच नाले तुंबत असल्याने दिब्रुगडमध्ये पाण्याचा लवकर निचरा होत नाही. त्यामुळे, पूरस्थिती उद्‌भवते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पुरामुळे गेले आठ दिवस अंधारात राहणाऱ्याहा दिब्रुगडमधील रहिवाशांनी विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्याची विनंती सरमा यांना केली. मात्र, पुराच्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरून दुर्घटना होऊ नये, म्हणून तो बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी रहिवाशांना दिली. आसाममध्ये यंदा पुराने कहर केला असून २२ लाख लोक पुरात अडकले आहेत. यात धुब्री जिल्ह्यातील सर्वाधिक ६,४८, ८०६ लोकांचा समावेश आहे.

आसाम पाण्यात

  • पूरग्रस्त जिल्हे : २९

  • प्रभावित लोक : २२ लाख

  • एकूण मृत्यू : ६२

  • मदत छावण्या : ६९८

  • अाश्रय घेतलेले नागरिक : ३९,३३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT