aasa 
देश

DNLA च्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची कारवाई

कार्तिक पुजारी

दिसपूर- आसाममध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत दिमासा राष्ट्रीय नॅशनल आर्मीचे Dimasa National Liberation Army (DNLA) 7 कॅडर मारले गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्बी अंगलाँग जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत DNLA च्या सहा कॅडरचा खात्मा करण्यात आला. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Assam 6 cadres of rebel outfit DNLA killed in encounter security forces )

रविवारी सकाळी सुरु करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये आसाम पोलिस आणि आसाम रायफल्सनी सहभाग घेतला होता, यात DNLA चे 7दहशतवादी धनसिरी भागात मारले गेले आहेत. स्पेशल डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस जीपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. कार्बी अंगलाँग आणि दिमा हसाव पोलिसांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता'. DNLA कॅडरच्या दहशतवाद्यासंबंधी आणि त्यांचा कोणत्या परिस्थितीत एनकाऊन्टर करण्यात आला याबाबत अधिकची माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, दिमासा राष्ट्रीय नॅशनल आर्मीची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. दिमासा जमातीसाठी एका सार्वभौम आणि स्वतंत्र्य राष्ट्राची निर्मिती करणे DNLA चे उद्धिष्ट आहे. नाईसोडाव दिमासा Naisodao Dimasa हा संघटेचा प्रमुख आहे, तक खरमिनडाव दिमासा गृहसचिव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT