

How Did Vaibhav Suryavanshi Get Out Against Nepal?
esakal
How Did Vaibhav Suryavanshi Get Out Against Nepal?: रायझिंग स्टार्स आशिया कपमधील भारत अ संघाचा सलामीचा सामना शुक्रवारी (२० नोव्हेंबर) नेपाळशी खेळवला जात आहे. या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.
दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगत आहे. या स्पर्धेत भारतीय अ संघाचं नेतृत्व तिलक वर्मा करत आहे, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि युवा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले.