Congress Parody Video eSakal
देश

Rahul Gandhi : 'काँग्रेसने ईशान्य भारत शेजारी राष्ट्रांना विकला'; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप! 'या' व्हिडिओची चर्चा

Congress Parody Video : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा यांनी आपल्या एक्स हँडलवरुन या व्हिडिओचे काही स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत.

Sudesh

काँग्रेसने शनिवारी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचा एक पॅरोडी व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमधील देशाच्या नकाशातून चक्क भारताचा नॉर्थ-ईस्ट भाग गायब असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सर्मा यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओवरून राहुल गांधींवर टीका करण्यात येत आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सर्मा यांनी आपल्या एक्स हँडलवरुन या व्हिडिओचे काही स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. यामधील भारताच्या नकाशाकडे लक्ष वेधून घेत त्यांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत.

"संपूर्ण इशान्य भारत एखाद्या शेजारील राष्ट्राला विकण्यासाठी कदाचित काँग्रेसने गुप्तपणे करार केला आहे. यासाठीच तर राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले नव्हते ना?" असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे व्हिडिओ?

काँँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन एक पॅरोडी व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्याशी साधर्म्य दाखवणारे दोन अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर दाखवण्यात आले आहेत. यात 1975 साली आलेल्या 'दीवार' चित्रपटातील सीन रीक्रिएट करण्यात आलेला आहे. व्हिडिओमधील मोदींना अमिताभ बच्चन यांच्या जागी ठेवण्यात आलं आहे, तर राहुल गांधी यांना शशी कपूर यांच्या जागी.

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, की 'माझ्याकडे ईडी आहे, पोलीस आहेत, पॉवर आहे, पैसा आहे, मित्र आहेत.. तुझ्याकडे काय आहे?' त्यावर राहुल गांधी रिप्लाय देतात की 'माझ्या सोबत संपूर्ण देश आहे.' दीवार चित्रपटातील 'मेरे पास माँ है' या सुप्रसिद्ध डायलॉगची ही कॉपी आहे.

या व्हिडिमध्ये हे दोघे बोलत असताना मागे भिंतीवर एक पोस्टर आहे. या पोस्टरमध्ये भारताचा नकाशा दाखवला आहे. मात्र, या नकाशात संपूर्ण नॉर्थ-इस्ट भारत दिसत नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर आणखी एक वॉर सुरू झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT