In Assam officials lock down 3 villages as thousands attend preachers funeral 
देश

धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आसाममधील नागाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून तेथे १० हजारांच्या संख्येनी लोकं एकत्र उपस्थित राहिली आहेत. यामुळे आसाममधील तीन गावांत शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्शिंगचा वापर करा, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असा सल्ला सतत दिला जात असतानाही आसाममध्ये हा प्रकार घडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागाव जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरू आणि आमदार अमीनूल इस्लाम यांचे वडील खैरूल इस्लाम यांच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल दहा हजार लोकं उपस्थित होते. ८७ वर्षांचे खैरूल इस्लाम यांच्यावर २ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधीला दहा हजार लोकं उपस्थित होते. प्रशासनाला माहिती मिळताच जवळील तीन गावे सील केली आहेत. 

खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक हजर असल्याचं दिसतेय. नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार, अंत्यविधीसाठी कमीत कमी दहा हजार जणांची उपस्थिती होती. यासंदर्भात पोलिसांनी दोन गुन्हे देखील दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या लोकांनी लॉकडाऊनच्या काळातील कोणतेही नियम पाळलेले नाहीत. सोशल डिस्टन्शिंगचा येथे फज्जा उडाला आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी या ठिकाणी मास्कचाही वापर केलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !

आमदार अमीनूल इस्लाम यांनी मात्र स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'माझे वडील खैरूल इस्लाम हे अतिशय ख्यातनाम व्यक्ती होते. त्यांच्या अनुयायांची संख्याही मोठी आहे. खैरूल इस्लाम यांच्या निधनाची बातमी आम्ही प्रशासनाला तात्काळ दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधीची व्यवस्था करावी असे आम्ही सांगितले होते असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT