rape case
rape case  File photo
देश

'स्वप्नात येऊन माझ्यावर बलात्कार केला', महिलेची पोलिसात तक्रार

दीनानाथ परब

पटना: बिहारमध्ये (bihar) बलात्काराची एक विचित्र तक्रार दाखल झाली आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेने (women) मांत्रिकाने आपल्यावर स्वप्नात येऊन बलात्कार केला अशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मांत्रिकाने (Occultist) स्वप्नात येऊन वारंवार आपल्यावर बलात्कार केला, असा या महिलेचा दावा आहे. कुडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांधी मैदान परिसरात महिला राहते. मुलगा आजारी असल्यामुळे यावर्षी जानेवारी महिन्यात सदर महिला मांत्रिकाकडे गेली होती. (Assault Me in Dreams Bihar Woman Approaches Police Against Occultist)

मांत्रिकाने या महिलेला एक मंत्र दिला व मुलगा बरा व्हावा यासाठी काही विधी करायला सांगितले. पण मुलाचा १५ दिवसांनी मृत्यू झाला. "मुलाचा मृत्यू झाल्यानंतर महिला मांत्रिक वास्तव्याला असलेल्या मंदिरात गेली व आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला ते सांगा? असे स्पष्टीकरण मागितले. मांत्रिकाने आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न केला पण मुलाने आपली सुटका केली असाही आरोप या महिलेने केला" कुडवाचे एसएचओ अंजनी कुमार यांनी ही माहिती दिली. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.

मांत्रिकाने बलात्काराचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेने तक्रार केली नाही. पण त्यानंतर मांत्रिक स्वप्नात येऊन आपल्यावर बलात्कार करतो, असा दावा या महिलेने केला आहे.

"लिखित तक्रार मिळाल्यानंतर आम्ही मांत्रिकाची चौकशी केली. मांत्रिकाने आरोप फेटाळले असून आपण कधी त्या महिलेला भेटलो नाही, असे त्याने सांगितले. मांत्रिकाविरोधात आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे बाँड फाईल करुन आम्ही त्याची सुटका केली" असे एसएचओने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

Murlidhar Mohol : वाहतूक सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार ; मोहोळ यांचे आश्वासन,कोंडीची समस्या सुटण्यास होणार मदत

SCROLL FOR NEXT