Bypolls Result 2023 eSakal
देश

Bypolls Result 2023 : विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात; उत्तराखंड-त्रिपुरामध्ये भाजपचा विजय!

त्रिपुरामधील धनपूर आणि बॉक्सानगर जागांवर भाजपचा विजय झाला आहे.

Sudesh

देशातील सहा राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडत आहे. या निवडणुकीत पाच जागा विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने एकत्र येत लढल्या होत्या. यातील त्रिपुरामधील धनपूर आणि बॉक्सानगर जागांवर भाजपचा विजय झाला आहे.

बॉक्सानगर जागेवर भाजपच्या तफज्जल हुसैन यांचा विजय झाला. त्यांनी सीपीआय (एम) च्या मिझान हुसैन यांचा पराभव केला. मिझान यांना 3,909 मतं मिळाली, तर तफज्जल यांना तब्बल 34,146 मतं मिळाली.

दुसरीकडे धनपूर जागेवर भाजपच्या बिंदू देबनाथ यांचा विजय झाला. त्यांना 30,017 मतं मिळाली. सीपीआय (एम) पक्षाचे कौशिक चंदा यांचा या निवडणुकीत पराभव झाला. कौशिक यांना केवळ 11,146 मतांवर समाधान मानावं लागलं.

केरळमध्ये काँग्रेसचा विजय

केरळमधील पुथुप्पल्ली जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे. चांडी ओम्मन या उमेदवाराचा विजय झाल्याचं पीटीआयने आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितलं आहे. इलेक्शन कमिशनच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

बागेश्वर जागेवर भाजपचा विजय

उत्तराखंडमधील बागेश्वर या जागेवर भाजप उमेदवार पार्वती दास यांचा विजय झाला आहे. याठिकाणी त्यांनी काँग्रेसचा पराभव केला आहे. 2,810 मतांनी त्यांचा विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT