देश

Assembly Elections 2023: 60 लाख युवक पहिल्यांदाच करणार मतदान; आयोगाच्या 'या' योजनेमुळं वाढली संख्या

केंद्रीय निवडणूक आयोगानं पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभेची लिटमस टेस्ट असणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका अखेर सोमवारी जाहीर झाल्या. या निवडणुकांमध्ये कोणाचं पारडं जड राहिल यावर पुढच्या वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या लोकसभेचा संभाव्य निकाल अवलंबून असणार आहे. पण यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत नवमतदार. (Assembly Elections 2023 60 lakh youth will vote for first time number increased due to special scheme of registration)

६० लाख नवमतदार वाढले

यापार्श्वभूमीवर या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये यंदा नव्यानं नोंदणी केलेले आणि १८-१९ वय असणारे ६० लाख मतदार असणार आहेत. पात्रता तारखांच्या दुरुस्तीमुळं सुमारे १५.३९ लाख तरुण मतदार मतदानास पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाव नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी

यापूर्वी मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनाच आपलं नाव नोंदवता येत होतं. १ जानेवारीनंतर १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांना थेट पुढच्या वर्षीच नोंदणी करावी लागत होती.

पण २८ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगानं केलेल्या नव्या बदलांनुसार, वयाची १७ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती, त्यानुसार त्यांना १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही.

त्यानुसार, तरुणांना गेल्यावर्षीपासून १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या तारखांना नोंदणी करता येणं शक्य झालं. त्यामुळं यंदा १५ लाखांच्यावर नव्या मतदारांची संख्या वाढली आहे.

तरुणचं करणार मतदान केंद्रांचं व्यवस्थापन

दरम्यान तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी २९०० मतदान केंद्रांचं व्यवस्थापन हे तरुणांकडूनच केलं जाणार आहे, अशी माहिती देखील यावेळी राजीव कुमार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT