देश

काँग्रेस घुसखोरांसाठी दरवाजे उघडेल : शहा

पीटीआय

नलबारी - काँग्रेस आणि एआययूडीएफची आघाडी आसामचे सर्व दरवाजे घुसखोरांसाठी उघडेल. ही घुसखोरी रोखण्याचे काम केवळ भाजप करू शकतो. आम्हाला आणखी पाच वर्षे सत्ता द्या, राज्याला हिंसाचार, आंदोलने आणि पूर यांच्यापासून मुक्त करू, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले.

आसाममध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) यासह पाच पक्षांची युती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नलबारी येथे भाजपतर्फे ‘विजय संकल्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना शहा म्हणाले, ``काँग्रेस नेहमीच भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करते. मात्र काँग्रेसने केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत आणि आसाममध्ये बद्रुद्दीन अजमल यांच्या  एआययूडीएफ पक्षाशी युती केली आहे. हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत का?  आसाममध्ये गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि एआययूडीएफचे सरकार होते. त्यांनी राज्यासाठी काय केले? १३ व्या वित्त आयोगाने आसामसाठी ७९ हजार कोटी  रुपये दिले होते, १४व्या वित्त आयोगाद्वारे भाजप सरकारने १.५५ लाख कोटी रुपये राज्याला दिले आहेत.`` 

``बोडो विभागातील रस्त्यांच्या विकासासाठी ५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. रस्त्यांचे हे काम झाल्यानंतर हा संपूर्ण विभाग विकासाच्या मार्गावर असेल. आसाममध्ये नवे रस्ते तयार होत आहे, महाविद्यालये उघडली जात आहेत,. येत्या काही काळांत पुराच्या समस्येतून जनतेला बाहेर काढण्याचे कामही भाजपचे सरकार करेल, `` असे शहा म्हणाले.

पुढील लोकसभेच्या निवडणुकीत भाजप पुन्हा 
सत्तेत आली तर, देशभरातील ३५०० मशिदी ते पाडतील. ते पुन्हा सत्तेत आले तर, महिलांनी बुरखा वापरू नये, मुस्लिमांनी दाढी वाढवू नये आणि पारंपरिक टोप्याही घालू नयेत, यासाठी  प्रयत्न केले जातील. 
- बद्रुद्दीन अझमल, एआययूडीएफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT