Mamata Banerjee
Mamata Banerjee esakal
देश

गोव्यातील पराभवामुळे ‘तृणमूल’च्या महत्त्वाकांक्षांना चाप

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : गोव्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त धक्का बसल्याने तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला लगाम बसला आहे. मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांनी ‘तृणमूल’ला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय पातळी प्रमोट करायला सुरूवात केली होती. गोव्यामध्येही पक्षाने मोठी ताकद लावली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्थानिक आणि राष्ट्रीय असे दोन्ही नेते उतरले होते. प्रत्यक्षात मात्र ‘तृणमूल’ला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला केवळ ५.२१ टक्के एवढीच मते मिळाली आहेत.

गोव्याच्या ‘लिटमस टेस्ट’मध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतरही मेघालय आणि त्रिपुरासाठीही ‘तृणमूल’ने नव्याने रणनीती आखायला सुरूवात केली आहे. या अपयशाबाबत बोलताना तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत सिन्हा म्हणाले की, ‘‘ तुम्ही एक ते दोन निवडणुका हारल्या म्हणजे सगळे काही संपत नसते. केवळ एका विजयामध्येच सगळा मूड बदलून जातो. प्रत्येकजण आमच्या पक्षाने किती जागा जिंकल्या अशी चर्चा करतो आहे पण आम्ही मिळविलेल्या मतांबाबत मात्र कोणीही भाष्य करत नाही. काही दिवसांमध्ये गोव्यात पाय रोवणाऱ्या आमच्या पक्षाने पाच टक्के मते मिळविली आहेत. ही आमच्या पक्षाची खूप चांगली सुरूवात आहे.’’

रणनीतीचा फेरआढावा घ्यावा लागणार

मागील वर्षी त्रिपुरामध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला २४ टक्के एवढी मिळाली होती पण त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. गोव्यातील आमच्या पक्षाची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती त्यामुळे आम्हाला पुन्हा रणनीतीचा अभ्यास करावा लागेल. हा आमच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धक्का असून गोव्यामध्ये आम्ही वेळ आणि पैसा खर्च केला होता पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आता पुढे जाताना आम्हाला रणनीती बदलावी लागेल, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे अनेक नेते आहेत पण ममता बॅनर्जी या सर्वांत ज्येष्ठ आहेत.

- यशवंत सिन्हा,उपाध्यक्ष, तृणमूल काँग्रेस

राजकारण ही दीर्घकाळ चालणारी लढाई असते, ‘आप’ला दोन ते तीन वर्षे काम केल्यानंतर फक्त दोन जागा मिळविता आल्या आहेत. आम्ही आखलेल्या रणनीतीचे महत्त्व आजही कायम आहे.

- सुखेंदू शेखर रे,प्रवक्ते, तृणमूल काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT