देश

माल्ल्या-मोदी-चोक्सीला दणका! 9,371कोटींची संपत्ती बँकांकडे

नामदेव कुंभार

भारतीय बँकांना गंडा घालून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना ईडीने मोठा झटका दिला आहे. भारतातील सार्वजनिक बँकामधून कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन या तिन्ही उद्योगपतींनी विदेशात पळ काढला होता. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात तपास सुरु होता. ईडीनं कारवाई करत विजय माल्ल्या, नीरव मोदी, आणि मेहुल चौक्सी यांची 18 हजार 170 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आज, बुधवारी यापैकी 9 हजार 371 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे.

विजय माल्ल्या आणि पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात सार्वजनिक बँकांची 40 टक्के रक्कम पीएमएलएनुसार जप्त केलेल्या शेअर्सच्या विक्रीतून वसूल करण्यात आल्याचं ईडीनं सांगितलं. अंमलबजावणी संचालनालयाने ट्विट करत म्हटले की, ईडीने फक्त पीएमएलएवुसार विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी प्रकरणात 18,170.02 कोटी (बँकाच्या एकूण नुकसानीच्या 80.45%) रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. 9371.17 कोटी रुपये किंमतीची संपत्ती सरकारी बँकांना ट्रान्सफर करण्यात आली आहे.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीने उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT