Covishield Vaccine  sakal
देश

Covishield Vaccine : ‘ॲस्ट्राझेनेका’कडून ‘कोव्हिशिल्ड’ लस माघारी; सीरमने दिलं स्पष्टीकरण

कोरोनावरील उपचारांसाठी लस बनविणाऱ्या अमेरिकेतील ‘ॲस्ट्राझेनेका’ या औषधनिर्माण कंपनीने आपली ही लस जगभरातून माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीने सीरम इन्स्टिट्यूटबरोबर भागीदारी करत भारतात ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने या लस पुरविली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारांसाठी लस बनविणाऱ्या अमेरिकेतील ‘ॲस्ट्राझेनेका’ या औषधनिर्माण कंपनीने आपली ही लस जगभरातून माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीने सीरम इन्स्टिट्यूटबरोबर भागीदारी करत भारतात ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने या लस पुरविली होती. या लसीमुळे रक्त गोठत असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर लस माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या लशीत सुधारणा करण्यात आली असून त्याचा मोठ्या प्रमाणात साठा शिल्लक असल्यानेच आधीची लस माघारी घेत असल्याचे स्पष्टीकरण ‘ॲस्ट्राझेनेका’ने दिले आहे. ‘ॲस्ट्राझेनेका’ने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी भागीदारी करत ही लस विकसित केली होती. भारतात ‘कोव्हिशिल्ड’ आणि युरोपात ‘व्हॅक्सझेव्हरिया’ या नावाने या लशीचा पुरवठा करण्यात आला होता. लसीमुळे ‘थ्रोम्बॉसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम’ हा आजार होत असल्याची दुर्मीळ प्रकरणे आढळून आल्यानंतर ‘ॲस्ट्राझेनेका’नेही ते मान्य केले होते.

सीरमने उत्पादन २०२१ मध्येच थांबवले

पुणे : भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण झाल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्येच ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने कोव्हिशिल्डचे अतिरिक्त उत्पादन आणि पुरवठा थांबविला होता. अॅस्ट्राझेनिका कंपनीने कोव्हिशिल्डच्या जुन्या लशीचे अतिरिक्त डोस परत मागविल्यानंतर देशभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीरमने हे स्पष्टीकरण दिले आहे.

सीरमच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करत यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘लशीच्या पॅकिंगवर अगदी सुरुवातीपासूनच अत्यंत दुर्मिळ असलेल्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमचाही उल्लेख आहे. वैश्विक कोरोना साथीतही लशीची सुरक्षितता सर्वतोपरी मानून पारदर्शकतेचे पालन करण्यात आले आहे. ॲस्ट्राझेनिका आणि सीरमच्या कोव्हिशिल्ड लशीने साथीच्या काळात लोकांचे जीव वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT