Exam esakal
देश

परीक्षेची प्रश्नपत्रिकासुद्धा विद्यार्थीच करणार तयार

IIT गोवामधील एक पेपर चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

वर्षभरापूर्वी देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि पाहता पाहता या विषाणूचं रौद्ररुप साऱ्यांनीच अनुभवलं. सध्या या विषाणूची दुसरी लाट आली असून अनेकांना याचा परिणाम भोगावा लागला आहे. सर्वसामान्य क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक विभागावरही त्याचे पडसाद उमटले असून अनेक परिक्षा रद्द केल्या आहेत. तर, काही ठिकाणी ऑनलाइन (online) स्वरुपात परिक्षा घेण्यात येत आहेत. यामध्येच IIT गोवामधील एक पेपर चर्चेत आला आहे. (at-iit-goa-set-own-questions-and-answer-them-too)

सध्या भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT गोवाच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा सुरु आहे. विशेष म्हणजे या काळात मुलांचं गुणांकन करण्यासाठी संस्थेने एक भन्नाट मार्ग शोधून काढला आहे. संस्थेने मुलांना त्यांचा पेपर स्वत:च काढायला सांगितला असून त्याची उत्तरदेखील लिहिण्यास सांगितली आहेत. मात्र, हा पेपर तयार करण्यासाठी संपूर्ण सेमिस्टरमध्ये मुलांनी जे शिकवण्यात आलं त्याच आधारावर प्रश्न तयार करावे लागणार आहेत.

चर्चेत आलेला पेपर ७० मार्गांचा असून हा पेपर दोन भागांमध्ये विभागला आहे. यापैकी ४० मार्कांच्या एका भागामध्ये विद्यार्थ्यांना स्वत: अभ्यासक्रमाच्या आधारे प्रश्नपत्रिका तयार करण्यास सांगितली. यासाठी त्यांना २ तास देण्यात आले होते. तर, दुसरा भाग ३० मार्कांचा असून यात विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यास सांगितलं आहे. तसंच या परिक्षेच्या काळात मित्रपरिवारासोबत चर्चा करुन प्रश्न काढण्यास सक्त मनाई आहे. जर, प्रश्नांमध्ये समानता आढळून आली तर त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे.

दरम्यान, या पेपरसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण पाठ्यपुस्तकाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. जर, सेमिस्टरमध्ये काय शिकवलंय हे विद्यार्थ्यांना माहित नसेल तर त्यांना पेपर काढता येणार नाही. म्हणूनच सध्या सोशल मीडियावर या अनोख्या परीक्षेची चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT