देश

गुजरात : मोरबी येथे भिंत कोसळून 12 मजुरांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील हलवाद जीआयडीसी येथे हा अपघात घडला आहे. याबाबत एएनआयने ट्वीट केले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकले आहे का याचा शोध घेण्यात येत आहे. (12 People Died Due To Wall Collapsed In Gujrat Morbi Halvad District )

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील हलवड जीआयडीसी येथील हलवड औद्योगिक परिसरात सागर सॉल्ट पॅकेजिंगचा कारखाना आहे. दरम्यान, यावेळी या कारखान्याची भिंत अचानक कोसळली. यात 12 मजुरांचा मृत्यू झाल्याचे राज्याचे कामगार व रोजगार मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकले आहे का याचा शोध घेण्यात येत आहे.

PMO कडून मदत जाहीर

दरम्यान, मोरबी येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीदेखील भिंत कोसळून मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री पटेल यांनी मोरबीचे जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

मोरबी येथील कारखान्याची भिंत कोसळून झालेली घटना हृदय हेलावणारी आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत असून, अपघातात जखमी झालेले मजूर लवकर बरे होवोत अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update: ...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT