Atik Ahmed Sakal
देश

Atik Ahmed Murder Case : 'जय श्रीराम' म्हणत झाडल्या गोळ्या; पत्रकार बनून आले होते अतिक,अशरफचे मारेकरी

अतिक आणि अशरफला जेव्हा गोळी मारली गेली, तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारत होते.

वैष्णवी कारंजकर

अतिक अहमदच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ज्यावेळी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफची हत्या करण्यात आली, तेव्हा पोलीस त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. अतिक आणि अशरफला जेव्हा गोळी मारली गेली, तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारत होते, ते उत्तर देणार, तेवढ्यात त्यांना गोळी मारण्यात आली.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मारेकरी हे माध्यमकर्मी म्हणून तिथे आले होते. त्यांनी आपल्या गळ्यात आयकार्डही घातलं होतं. त्यांनी अनेक गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर जय श्रीरामचे नारेही दिले. मात्र यानंतर लगेचच दोन्ही हात वर करत सरेंडरही केलं.

पोलिसांनी गोळ्या झाडणाऱ्या तिघांनाही अटक केली आहे. प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी तीन पिस्तुल, एक मोटर सायकल, एक व्हिडीओ कॅमेरा आणि न्यूज चॅनेलचा एक लोगो पडलेला आढळला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या अशा हत्येने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अतिक आणि अशरफ यांचे मृतदेह हटवण्यात आले आहे. या दोघांनाही २००५ च्या उमेश पाल हत्याकांड प्रकरणात सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं. झाशी इथं १३ एप्रिल रोजी अतिकचा मुलगा असद आणि त्याचा एक सहकारी एन्काऊंटरमध्ये मारले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT