Atiq Ahmed Murder 
देश

Atiq Ahmed Murder: गँगस्टर अतिकच्या मारेकऱ्यांचं सलमान खान कनेक्शन! वाचा काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : गँगस्टरहून राजकारणी बनलेल्या अतिक अहमदला दोन दिवसांपूर्वी काही गुन्हेगारांनी गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. पण आता याच मारेकऱ्यांबाबत काही महत्वाचे खुलासे झाले आहेत. ज्या तीन तरुणांचं अभिनेता सलमान खानच्या धमकी प्रकरणाशी कनेक्शन समोर आलं आहे.

चौकशीदरम्यान, सनी सिंह, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी या तीनही हल्लेखोरांनी पोलिसांना सांगितलं की, ते लॉरेन्श बिश्नोईचे फॅन आहेत ज्यानं पंजाबी रॅपर आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याची गेल्यावर्षी मे महिन्यात गोळ्या घालून हत्या केली होती. याच बिश्नोईनं बॉलिवूड अभिनेता सलमान खानला देखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी बिश्नोईवर वेगळे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. बिश्नोई सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अतिकच्या या मारेकऱ्यांनी पुढे असंही सांगितलंय की, त्यांनी यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखती अनेक वेळा पाहिल्या आहेत.

फेमस होण्यासाठी केलं कृत्य

अतिकच्या हत्येनंतर तिघा मारेकऱ्यांविरोधात एफआयआर दाखल झाला. यामध्ये काही महत्वाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, तिनही मारेकऱ्यांना गँगस्टर अतिक अहमद त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांना गोळ्या घालून त्यांना प्रसिद्ध व्हायचं होतं, मोठं गँगस्टर व्हायच्या इच्छेनं त्यांनी हे कृत्य केलं. कारण गुन्हेगारीच्या जगतात काहीतरी बडं करण्यासाठी त्यांनी हे हत्याकांड घडवून आणलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

Latest Marathi News Update LIVE: शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन लिपीक गजाआड

Jasprit Bumrah And Hardik Pandya: वनडे मालिकेमधून हार्दिक, बुमराची माघार? टी-२० विश्‍वकरंडकाला प्राधान्य; आयपीएलनंतर वनडेकडे लक्ष

Health News : ससून, जे. जे. रुग्णालयांतील सेवा कंपन्यांकडे; 'पीपीपी'मुळे सरकारी आरोग्य सेवा धोक्यात- २१ डिसेंबरला मुंबईत मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT