Atiq-Ashraf Ahmed murder  
देश

"वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते अन्...." ; अतिक -अशरफची हत्या की एन्काऊंटर? नेमकं काय घडल?

Sandip Kapde

लखनऊ : उत्तर प्रदेशातील अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळीबारात हत्या झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. आजच असदचं कुटुंबियांकडून दफन करण्यात आलं त्यानंतर ही घटना घडली आहे. अतिक -अशरफची हत्या की एन्काऊंटर झाली की हत्या झाली, अशी चर्चा सुरू आहे. नेमकं काय घडल हे जाणून घेऊया.

उत्तर प्रदेश पोलीस आज अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाते होते. यावेळी पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. गोळीबार देखील करण्यात आला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे.

हा हल्ला झाला त्यावेळी दोघांना चौकशीसाठी नेले जात होते. दोघांचे मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. सध्या गोळीबार करणाऱ्यांचा शोध लागलेला नाही. मात्र यावेळी जय श्री रामच्या घोषणा नक्कीच ऐकू आल्या. पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत, अमर उजालाने याबाबत माहिती दिली आहे.

अतिक आणि अश्रफ पोलिसांच्या ताब्यात होते. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्याबाबत आज पोलीस पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पोलिसांच्या पथकाने शहरातील चकिया, कासारी मासारी, पीपळ गाव परिसरात छापे टाकले.

अतिक अहमद २००५ मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये उमेश पाल हत्याकांडातही आरोपी होता. यापूर्वी, अतीकचा मुलगा असद अहमद १३ एप्रिल रोजी झाशीमध्ये चकमकीत मारला गेला होता, त्यासोबत शूटर गुलामलाही यूपी एसटीएफने मारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT