atiq ahmed 
देश

अतिक अहमद-अशरफ हत्येच्या कटात पोलिस प्रशासन सामील होतं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - कडक पोलीस बंदोबस्तात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या सुनियोजित कट होता का? या कटामागे यूपी पोलिस आणि प्रशासनाचा हात होता का? अशी शंका देशातील कोणत्याही प्रसारमाध्यमांनी किंवा वृत्तसंस्थेने उपस्थित केली नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी उपस्थित केली आहे. खरे तर या हत्याकांडाशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या न्यायायधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला.

माजी खासदार आणि माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचे व्हिडीओ संपूर्ण देशाने टीव्हीवर पाहिले. आजूबाजूला पोलीस होते. प्रत्येकाकडे शस्त्रे होती, परंतु असे असतानाही तीन हल्लेखोर पोलिसांचा सुरक्षा घेरा तोडतात आणि अचानक अतीक आणि अशरफच्या अगदी जवळ पोहोचतात. तिथं ते दोघांनाही मरेपर्यंत गोळ्या घालतात. हे सर्व पोलिसांच्या डोळ्यासमोर घडते.

या दुहेरी हत्याकांडाचे व्हिडीओ देशाबरोबरच सर्वोच्च न्यायालयानेही पाहिले. पोलीस कोठडीतील या दुहेरी हत्याकांडावर सुप्रीम कोर्टाने खूप गंभीर आक्षेप घेतले. यामागे कोणाचा हात आहे. यामध्ये पोलिस किंवा प्रशासनातील व्यक्तींचा समावेश असण्याची शंका न्यायालयाने व्यक्त केली.

उत्तर प्रदेश सरकारला संतप्त सवाल

अतिक आणि अशरफ यांच्या हत्येत कोण सहभागी आहे?

पाच ते दहा पोलिसांच्या उपस्थितीत खून कसा झाला?

अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणाचा तपास कुठे पोहोचला?

यूपी सरकारने 2017 पासून झालेल्या 183 चकमकींचा स्टेटस रिपोर्ट द्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT