देश

PM मोदींकडून 'भारतीय अंतराळ संघा'चं उद्घाटन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील अंतराळ उद्योगाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी 'इंडियन स्पेस असोसिएशन' (ISPA) चं म्हणजेच भारतीय अंतराळ संघाचं उद्घाटन केलंय. सकाळी 11 वाजता व्हर्च्युअली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी अंतराळ क्षेत्रातील काही प्रमुख उद्योजकांशी संवाद देखील साधला आहे. यावेळी मोदींनी स्पेस सेक्टर, त्याचे महत्त्व आणि त्यातील सुधारणांसंदर्भात आपली मते मनोगतातून मांडली आहेत.

पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलंय की, आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नामुळे, आपला देश काही महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणतो आहे. हे फक्त स्वप्न नाहीये तर पूर्ण विचारांती बनवलेलं असं एकात्मिक आर्थिक धोरण आहे ज्यामुळे आपला जागतिक विकास सुलभ होतो आहे.

याआधी, स्पेस सेक्टर हे सरकारला समांतर होतं. मात्र, आम्ही आता ही मानसिकता बदलली आहे. आता स्पेस सेक्टरमध्ये आम्ही नाविन्य आणलंय तसेच सरकार आणि स्टार्टअप्समध्ये सहकार्याचा मंत्र दिला आहे. हा नवा मंत्र सध्या भारतासाठी खूपच आवश्यक आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, स्पेस सेक्टरमधील सुधारणांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन चार खांबांवर आधारित आहे. यामध्ये नवीन कल्पनांमध्ये खाजगी क्षेत्राला स्वातंत्र्य, क्षेत्राला सक्षम करणारी सरकारची भूमिका, युवांना भविष्याच्या दृष्टीने सुसज्ज करण्यासाठी तसेच सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून स्पेस सेक्टरकडे पाहणे, यांचा समावेश आहे.

सध्याचा काळ हा गतीने नवकल्पनांना साकारण्याचा काळ आहे. सरकारने हँडलरची भूमिका न बजावता इनेबलर म्हणून भूमिका बजावली तरच हे साध्य होऊ शकणार आहे. सध्या सरकार स्वत:चे कौशल्य प्रदान करत आहे तसेच खासगी क्षेत्रासाठी लाँच पॅड प्रदान करत आहे. आता इस्रोची सुविधा खासगी क्षेत्रासाठी सुद्धा उपलब्ध झाली आहे. आज आंतरराष्ट्रीय बालिका दिवस देखील आहे. महिला शास्त्रज्ञांचं भारताच्या मंगळ मोहिमेतील सहभाग आणि त्यांनी केलेला जल्लोष आपण कसे विसरू शकतो? मला आशा आहे की, अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे महिलांच्या सहभागास अधिक प्रोत्साहित करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT