Karnataka Crime Ne esakal
देश

गुंडांचं लज्जास्पद कृत्य, आदिवासी महिलेला मारहाण करून केलं विवस्त्र

सकाळ डिजिटल टीम

दक्षिण कन्नड जिल्ह्यात काही गुंडांचं लाजिरवाणं कृत्य समोर आलंय.

कर्नाटक : सध्या महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात (South Kannada Karnataka) काही गुंडांचं लाजिरवाणं कृत्य समोर आलंय. काही बदमाशांनी आदिवासी महिलेला (Tribal Women) बेदम मारहाण केली आणि नंतर तिला विवस्त्र केलं, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Karnataka Police) 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून हे प्रकरण 19 एप्रिलचं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

पीडित महिलेचं वय अंदाजे 35 वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय. यामागं जमिनीशी संबंधित प्रकरण असल्याचंही बोललं जातंय. संदीप, संतोष, गुलाबी, कुसुमा, लोकैही, अनिल, ललिता आणि चन्नकेशव या आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी सांगितलं की, पीडित मुलगी आणि तिची मोठी बहीण कर्नाटक सरकारनं दिलेल्या जमिनीच्या एका भागात झोपडपट्टीत राहतात. काही आरोपी महिलेला जमीन देण्यास विरोध करत होते. महसूल अधिकारी तिथं पोहोचल्यावर आरोपींनी त्यांनाही विरोध केला. त्यानंतर अधिकारी तेथून निघून गेल्यावर आरोपींनी महिलेला मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पीडितेच्या आईवरही हल्ला केलाय. आरोपी महिलेला मारहाण करून तिचे कपडे काढत असताना ग्रामपंचायत सदस्यांव्यतिरिक्त गावातील लोकही मूक प्रेक्षक बनून हा तमाशा पाहत होते. मात्र, यावेळी तिथं उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. दरम्यान, व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दंगल करणे, दुखापत करणे आणि महिलेवर बळाचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitchell Starc: मिचेल स्टार्कने रचला इतिहास! कपिल देवांना मागे टाकलं, मुरलीधरन नंबर-1; टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर?

लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहूच नका... आजच्या पिढीला मृणाल दुसानिसचा सल्ला; म्हणते- १०- ११ वर्षांपूर्वी...'

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

SCROLL FOR NEXT