फाइल फोटो Sakal
देश

Gujrat News : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध! पोरबंदर येथून परदेशी नागरिकासह चौघांना अटक

रोहित कणसे

एटीएसने गुजरात येथील पोरबंदर येथून एका परदेशी नागरिकासह चार जणांना अटक केली आहे. या लोकांचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते. दहशतवाद विरोधी पथकाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरमध्ये मोठी कारवाई केली आहे. पोरबंदरमधून एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

विदेशी नागरिकांसह चौघेही इसिसचे सक्रिय सदस्य असून त्यांच्या ताब्यातून अनेक प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून चौघेही कट्टरवादी विचारसरणीत सामील झाले होते. एका वृत्तानुसार, पोरबंदरमधून अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये सुरतमधील एका महिलेचाही समावेश आहे. तिचे नाव सुमेरा असे सांगितले जात आहे.

अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवायांची माहिती मिळत होती. त्यासाठी एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते.

त्यांच्या संपर्कात कोणी स्थानिक व्यक्ती आहे का, याचाही एटीएस अधिकारी शोध घेत आहेत. ते गुजरातमध्ये कधीपासून राहत होते. त्यांचा उद्देश काय होता? हा परदेशी नागरिक कोणत्या देशाचा रहिवासी आहे, अधिकाऱ्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. या चौघांकडूनही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT