maulana kaleem siddiqui and sana khan 
देश

ATS च्या अटकेत असलेले मौलाना सना खानच्या निकाहमुळे होते चर्चेत

मौलाना कलीम सिद्दिकी यांना एटीएसने धर्मांतरण प्रकरणी मेरठमधून अटक केली आहे.

स्वाती वेमूल

मौलाना कलीम सिद्दिकी maulana kaleem siddiqui यांना एटीएसने धर्मांतरण प्रकरणी मेरठमधून अटक केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या धर्मांतर प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. ते जामिया इमाम वलिलुल्लाह ट्रस्ट चालवत होते. या ट्रस्टच्या माध्यमातून मदरशांना आर्थिक रसद पुरवली जात होती. तर ट्रस्टला परदेशातून पैसे मिळत होते अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली. मौलाना यांनी बॉलिवूडची माजी अभिनेत्री सना खानचा sana khan निकाह लावून दिला होता. त्यावेळीसुद्धा ते चर्चेत आले होते.

मंगळवारी मौलाना कलीम सिद्दिकी यांच्यासह त्यांचे सहकारी मेरठमधील एका मशिदीत कार्यक्रमासाठी आले होते. रात्री नऊ वाजता ते पुन्हा घरी परतत असताना एटीएसने त्यांना ताब्यात घेतलं होत. मौलाना कलीम सिद्दिकी यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचं म्हटलं जात होतं.

सना खानच्या निकाहमुळे आले होते चर्चेत

अभिनेत्री सना खानने अचानक बॉलिवूड इंडस्ट्री सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. अभिनयापासून दूर इस्लामिक पद्धतीने जीवन व्यतित करणार असल्याचा निर्णय तिने घेतला. तिचा हा निर्णय फार चर्चेत होता. त्यानंतर अचानक एके दिवशी तिचा अनस सय्यदशी निकाह पार पडला. मौलाना कलीम सिद्दिकी यांनीच हा निकाह लावून दिला होता. सना खान सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

काळजाचा थरकाप! अचानक टायर फुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; ५ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत

पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ऐतिहासिक कपात; नव्या किमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT