Terrorists Attack esakal
देश

Terrorists Attack : सुरक्षादलांच्या छावणीवर दहशतवाद्यांकडून हल्ला

मणिपूरमध्ये दोघे हुतात्मा अन्य दोघे जखमी

सकाळ डिजिटल टीम

इंफाळ ः मणिपूरच्या विष्णूपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले तर अन्य दोघेजण हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोईरांग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाराणसेईना येथे हा हल्ला झाल्याची माहिती ‘इंडियन रिझर्व्ह बटालियन’कडून देण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरूवातीला डोंगराळ भागातून ‘सीआरपीएफ’च्या छावणीवर गोळीबार केला त्यानंतर जवळून हल्ला करण्यात आला.

साधारणपणे मध्यरात्री साडेबारानंतर गोळीबाराला सुरूवात झाली होती. पहाटे २.१५ पर्यंत हा गोळीबार सुरूच होता अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या गोळाबारामध्ये आसामच्या कोकराझार या जिल्ह्यातील रहिवासी उपनिरीक्षक एन. सरकार आणि पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील अरुप सैनी हे हेडकॉन्स्टेबल हुतात्मा झाले. अन्य एक निरीक्षक जादव दास आणि कॉन्स्टेबल अफताब दास हे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर इंफाळमधील ‘रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मध्ये उपचार सुरू असून दोघाजणांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे समजते. येथील ‘इंडियन रिझर्व्ह बटालियन’ला संरक्षण देण्यासाठी ‘सीआरपीएफ’चे जवान तैनात करण्यात आले होते.

जवानांवरील या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात. हुतात्मा जवानांचे बलिदान वाया जाणार नाही.

- एन. बिरेनसिंह, मुख्यमंत्री मणिपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT