Bihar Former CM Jitan Ram Manjhi esakal
देश

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीवर प्राणघातक हल्ला; मांझी म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

'माझी भाची पंचायत समितीची निवडणूक जिंकलीय, यावर कोइरी समाजात नाराजी आहे.'

बिहारमधून (Bihar) एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Bihar Former CM Jitan Ram Manjhi) यांच्या नातेवाईकावर काही लोकांनी हल्ला केलाय. यामध्ये एका तरुणाच्या डोक्याला दुखापत झालीय. जीतन राम मांझी यांनी सांगितलं की, त्यांची भाची केसरी देवी आणि तिच्या कुटुंबावर स्थानिक गुंडांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात काही लोक जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या घटनेनं संतापलेल्या जीतन राम मांझी यांनी जर आपल्यासोबत अशी घटना घडली असती, तर त्यांनी हल्लेखोरांवर गोळीबार करून 2 ते 5 जणांना ठार केलं असतं, असं म्हंटलंय. हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) प्रमुख जीतन राम मांझी त्यांच्या कुटुंबीयांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (Hindustani Awam Morcha) प्रमुख जीतन राम मांझी पुढे म्हणाले, स्थानिक गुंडांसह सुमारे 25 लोकांनी माझी भाची केसरी देवी आणि तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केलाय. माझी भाची पंचायत सदस्य आहे. माझ्यासोबत अशी घटना घडली असती, तर मी त्यांच्यावर (हल्लेखोर) गोळीबार केला असता आणि किमान 2 ते 5 हल्लेखोरांना ठार केलं असतं, असा थेट इशारा दिलाय. मांझी पुढं म्हणाले, माझी भाची केसरी देवी पंचायत समितीची निवडणूक जिंकलीय, यावर कोइरी समाजात नाराजी आहे. निवडणुकीच्या वैमनस्यातूनच ही घटना घडल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

‘शाका लाका बूम बूम’मधला संजू झाला बाबा; सोशल मीडियावर केली 'खास' पोस्ट, नेटकरी म्हणाले...'छोटा संजू आता पुन्हा...'

Latest Marathi News Live Update : आखाती तणावाचा परिणाम; हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडरचा तुटवडा

Pune News: मतदारांना धमक्या! मतपत्रिका कोरी द्या, अन्यथा नोकरीला मुकाल; ‘मसाप’साठी आमदार, नगरसेवकही सक्रिय..

SCROLL FOR NEXT