पंजाब मधील बरमाला मध्ये स्कूल बसवर धारधार हत्याराने दोन गाडीस्वरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्लात बस ड्रायवर जखमी झाला आहे, धारधार हत्याराने बसच्या काचा फोडल्या आहेत. दरम्यान बस चालकाने प्रसंगअवधान दाखवत बस थेट DCP ऑफीस मध्ये घातली या मुळे बस मध्ये असलेल्या मुलांना काहीही झाल नाही. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
बर्नाळा हवाई दलाच्या केंद्रीय विद्या मंदिर शाळेच्या मुलांनी भरलेल्या बसवर बुधवारी काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यादरम्यान बसमध्ये सुमारे 34-35 मुल होती.शाळा सुटल्यानंतर ही बस मुलांना त्यांच्याघरी सोडण्यासाठी निघाली असता, तेव्हा आचानक चार गाडीस्वरांनी बसला चारी बाजुने घेरल आणि तलवार काठून हल्ला करायला सुरूवात केली. त्यामुळे बसचा आरसा फुटला आणि बस चालकाला गंभीर दुखापत झाली. तरीही चालकाने बसचा वेग वाढवला आणि बस DCP च्या ऑफिस मध्ये घातली.
बसवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला त्यामुळे प्रचंड घबराट निर्माण झाल्याचे बस हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शहरात दिवसाढवळ्या गुंडगिरीच्या प्रकारात खूप वाढत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे. असे हल्ले रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सध्याच्या सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत अशा पद्धतीने स्कूल बसवर हल्ला होणे ही धक्कादायक बाब आहे. दुसरीकडे बस मधील मुलांच्या आई वडिलांच म्हणन,आहे की स्कूल बसवर हल्ला होणे खुप चिंताजनक आहे, त्यानी शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दोषीना लवकरात लवकर अटक करावी आशी त्यांनी मागणी केली.
ड्रायवर लखविंहर सिंह यांनी पोलिसांना सांगितल की काही कारणामुळे माझी आणि काही युवकांशी भांडन झाली होते. त्या रागातुन हा हल्ला झाला असावा आशी भिती व्यक्त केली.
एक जन अटकेत
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना डीएसपी बर्नाला सतवीर सिंह बैंस यांनी सांगितले की, आम्ही एका हल्लेखोराला पकडले आहे. हल्लेखोरांची बस चालका सोबत जुना वाद होता. त्याचा राग मनात धरून हा हल्ला केला आहे,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.