Attempt to burn woman alive in Rajasthan Attempt to burn woman alive in Rajasthan
देश

महिलेला चेटकीण म्हणत जाळण्याचा प्रयत्न; झोपडीला लावली आग

सकाळ डिजिटल टीम

अजमेर : राजस्थानमध्ये महिलांवरील छेडछाडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. आजही काही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या महिलांना चेटकीण (डायन) म्हणत मारहाण करून ठार (Attempt) मारण्यासारख्या घृणास्पद घटना करीत आहेत. असाच एक प्रकार अजमेर जिल्ह्यातील मसुदा पोलिस ठाणे परिसरातून समोर आला आहे. या महिलेला चेटकीण असल्याचे भासवून जिवंत (Alive) जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Attempt to burn woman alive in Rajasthan)

मी नसून गावची रहिवासी आहे. अनेक महिन्यांपासून गावातील काही लोक चेटकीण ठरवून त्रास देत आहेत. गावातील लोकांच्या अत्याचारानंतर शेतात झोपडी बनवून राहायला गेली. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी गावातील काही लोक शेतात घुसले आणि झोपडीवर पेट्रोल टाकून आग (Fire) लावली, अशी माहिती पीडित महिलेने दिली.

झोपडीला आग लागल्यानंतर झोपडीतून बाहेर आली. यानंतर बाहेर उपस्थित लोकांनी पकडून पुन्हा आगीत टाकण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी मारहाण केली. यामुळे खूप त्रास सहन करावा लागला, असेही पीडित महिलेने सांगितले. महिलेने कसे तरी स्वत:ला सावरले आणि माजी सरपंचापर्यंत पोहोचली. यावेळी माजी सरपंचांनी तिला पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

महिलेने मसुदा पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्याचे अधिकारी दिनेश जीवनी यांनी गुन्हा दाखल केला आहे. दुर्गालाल, पवन, श्यामा आणि इतरांसह गावातील रहिवाशांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, अस पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT