Atul-Bhatkhalkar sakal media
देश

पुरे झाला देवा आता पंचनामा; मोदी-पवार भेटीनंतर भातखळकरांचे खोचक ट्वीट

शिवसेना खासदार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मंगळवारी ईडीने कारवाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार (Shrad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीनंतर देशासह राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आले असताना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत राज्यात सध्या सुरु असलेल्या ईडीच्या (ED Action) कारवांचा संदर्भ देत एक खोचक ट्वीट केले आहे. भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, पुरे झाला देवा आता पंचनामा, शरण आलो तुझिया धामा... असे म्हणत खोचक टीका केली आहे. (Atul Bhatkhalkar Tweet After Modi Sharad Pawar Meet)

शिवसेना खासदार आणि खासदार संजय राऊत (Sanajy Raut) यांच्यावर मंगळवारी ईडीने कारवाई केली आहे. त्यापूर्वी अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून, सध्या सुरू राज्यात सुरु असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवरच ही भेट घेतल्याचे म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक ट्वीट करत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

दरम्यान, मोदी यांच्यासोबत पार पडलेल्या भेटीदरम्यान लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कारवायांसदर्भात पंतप्रधान मोदींशी कुठलीही चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा यावेळी मांडला. त्यांच्यावर अन्याय झाला असून या कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवारांनी उपस्थित केल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या प्रलंबित नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Tushar Apte Resignation : बदलापुरातील तुषार आपटेंचा अवघ्या २४ तासांत राजीनामा, भाजपने स्विकृत नगरसेवकपद दिल्याने जोरदार टीका

NMMC Election: मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?

Eknath Shinde : नाशिकमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार?

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

SCROLL FOR NEXT